हिजाब प्रकरणावर चर्चा करणारे संघ स्वयंसेवक आणि प्रचारक यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण !
हिंदुत्वनिष्ठ योगी सरकार असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये धर्मांध हे हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण करण्यास धजावतात, याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे दिसून येते. अशांवर कठोर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील घाटमपूरच्या कोटद्वारे मोहल्ल्यातील बाजारामध्ये धर्मांधांनी केलेल्या आक्रमणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक घायाळ झाले. येथे संघाचे काही जण कर्नाटकातील हिजाब प्रकरणाविषयी चर्चा करत असतांना अबरार अहमद, अमीर हसन, समीर कैंडा, शहाबुद्दीन, गुड्डू, छोटे, झुल्फकार, इफ्तिखार, इतिश्याक, कासिम, सद्दाम, कमल हसन, शाहिद आदी २० जणांनी संघ शाळेचे शिक्षक यशराज आणि संघाचे नगर प्रचारक भास्कर सिंह उपाख्य मनीष यांच्यावर आक्रमण केले.
#KANPUROUTER #BREAKING
सरेबाज़ार में दबंगों का कहर लोहे की रॉड से किया हमला
आर एस एस नगर प्रचारक पर जानलेवा हमला,हालत गंभीर
बीते दिनों हिजाब मामले में दबंगों से हुई थी तीख़ी नोकझोंक
घाटमपुर क़स्बे के पुरानी बाज़ार का मामला@KanpurOuterpol @Uppolice pic.twitter.com/3LxbTJIArP— JMDNewsFLASH (@jmdnewsflash) February 20, 2022
या वेळी भास्कर सिंह यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि खिशातील ३५ सहस्र रुपयेही धर्मांधांनी लुटून नेले. या घटनेमुळे येथे तणाव निर्माण झाल्याने मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.