बांगलादेश सीमेवरील गोतस्करी करणार्या महंमद इनाम उल् हक याला अटक
सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसचा युवा नेता यांना पूर्वीच केली आहे अटक !
अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत !
नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) भारत-बांगलादेश सीमेवर गोतस्करी केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी महंमद इनाम उल हक याला अटक केली आहे. त्याला यापूर्वी सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभागाने) आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी अटक केली होती. त्याला नंतर जामीन मिळाला होता. हक भारत आणि बांगलादेश सीमेवरून गोतस्करी करत होता. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा युवा नेता विनय मिश्रा, त्याचा भाऊ विकास मिश्रा आणि सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी सतीश कुमार हे हक याला साहाय्य करत होते. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. मिश्रा बंधूंनी वर्ष २०१६ ते २०१७ या काळात हक याच्याकडून ६ कोटी रुपये उकळले होते.