उत्तरप्रदेशात आतंकवादी आक्रमणाशी संबंधित १४ खटले समाजवादी पक्षाच्या तत्कालीन सरकारने घेतले होते मागे !
- जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालणारा राष्ट्रघातकी समाजवादी पक्ष ! हे खटले मागे का घेतले, याचे अन्वेषण सध्याच्या भाजप सरकारने करणे आवश्यक !
- असा राष्ट्रघातकी पक्ष हा लोकशाहीसाठी घातक असल्याने त्याच्यावर बंदीच हवी !
नवी देहली – उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार असतांना वर्ष २०१३ मध्ये राज्यातील ७ जिल्ह्यांतील आतंकवादी आक्रमणाशी संबंधित १४ खटले मागे घेण्यात आले होते, असे समोर आले आहे. यांतील काही खटल्यांना मागे घेण्यास न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणात पुढे या आरोपींना दोषी ठरवून त्यांना २० वर्षांपर्यंतच्या शिक्षा झाल्या. भाजपने यापूर्वी समाजवादी पक्षावर आतंकवादी आक्रमणातील आरोपींच्या प्रती सहानुभूती दाखवल्याचा आरोप केला आहे.
समाजवादी पक्षाच्या सरकारने मागे घेतलेल्या खटल्यांमध्ये लक्ष्मणपुरी येथील ६, कानपूर येथील ३, तसेच वाराणसी, गोरखपूर, बिजनौर, रामपूर आणि बाराबंकी येथील प्रत्येकी एक खटला होता. विशेष म्हणजे ५ मार्च २०१३ मध्ये वाराणसीच्या खटला मागे घेतला तो ७ मार्च २००६ च्या येथील संकटमोचन मंदिर आणि रेल्वे स्थानक येथे झालेल्या बाँबस्फोटांशी संबंधित होता.