अबुझमाड (छत्तीसगड) येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या तरुणांची गावकर्यांकडून हकालपट्टी !
केंद्र सरकारने तात्काळ धर्मांतरविरोधी कायदा करून हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखावे ! – संपादक
अबुझमाड (छत्तीसगड) – येथे धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गावकर्यांची तरुण मुले ख्रिस्ती मिशनर्यांच्या आमिषाला बळी पडून धर्मांतर करत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गावकर्यांकडून तरुणांची गावातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे या तरुणांनी ‘आमचे नातेवाइक आणि गावकरी यांनी लूटमार आणि मारहाण केली’, अशी तक्रार पोलिसांत केली आहे. यावरून पोलिसांनी १५ जणांना नोटीस बजावली आहे. यानंतर ३ ग्रामपंचायतींतील गावकरी पोलीस ठाण्यामध्ये पोचले आणि त्यांनी धर्मांतरितांना फटकारले.
ख्रिस्ती प्रार्थना केल्यामुळे आजार बरा झाल्याचा धर्मांतरितांचा दावा
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांना योग्य साधना ठाऊक नसते आणि म्हणून त्यांची देवावरील श्रद्धा न्यून होते. अशांना ख्रिस्ती मिशनरी जाळ्यात ओढतात आणि त्यांचे धर्मांतर करतात, हे लक्षात घेता हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक
धर्मांतर करणारे मुकेश यादव, हेमनाथ, सन्नो आणि सोनादेवी गोटा यांनी सांगितले की, पूर्वी आम्ही देवतांची पूजा करत असूनही आम्ही आजारी पडत होतो. आजार बरा होत नसल्याने आम्ही ख्रिस्ती प्रार्थना करू लागलो आणि आम्हाला बरे वाटू लागले. यामुळेे आम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारला. आम्हाला तो आवडतो. आम्ही ख्रिस्ती धर्म सोडणार नाही.