शिवमोग्गा (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

  • हिजाबविरोधी पोस्टमुळे हत्या झाल्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आरोप

  • हत्येनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार

  • ३ जणांना अटक : इस्लामी संघटनेचा सहभाग असल्याचा संशय

  • हत्येच्या अन्वेषणासाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना

  • काँग्रेसच्या नेत्याने २ दिवसांपूर्वीच ‘हिजाबला विरोध करणार्‍यांचे तुकडे तुकडे करू’ असे म्हटले होते आणि त्यानंतर ही हत्या होते, याची चौकशी झाली पाहिजे ! – संपादक
  • कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना हिंदुत्वनिष्ठांची हत्या होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
  • हिंदु कार्यकर्त्याऐवजी एखाद्या मुसलमान कार्यकर्त्याची हत्या झाली असती, तर एव्हाना काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, साम्यवादी, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी पक्षांनी आकांडतांडव केले असते आणि यासाठी हिंदूंना उत्तरदायी ठरवले असते ! – संपादक
बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांची अज्ञातांनी चाकूने वार करून केली हत्या !

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथील सीगेहट्टी परिसरात २० फेब्रुवारीच्या रात्री बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा (वय २६ वर्षे) यांची अज्ञातांनी चाकूने वार करून हत्या केली. या आक्रमणात हर्षा घायाळ झाल्यानंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या हत्येमुळे येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यामुळे येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरात कलम १४४ लागू (जमावबंदी) करण्यात आले आहे. शिवमोग्गा येथे दोन दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या हत्येच्या अन्वेषणासाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. ‘पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना अटक केली असून या मागे इस्लामी संघटना असल्याचा संशय आहे’, असे राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले. ज्ञानेंद्र यांनी हर्षा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

कर्नाटकात हिजाबवरून वाद चालू झाल्यापासून बजरंग दलाकडून हिजाबला विरोध करण्यात येत आहे. (हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) शिवमोग्गा येथे हिजाबवरून आंदोलने होत आहेत. त्यामुळे येथे आधीपासूनच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती, तसेच काही काळासाठी कलम १४४ सुद्धा लागू करण्यात आले होते. त्यातच हर्षा यांची हत्या झाल्याने ती हिजाब प्रकरणामुळेच झाल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून केला जात आहे. हर्षा यांनी फेसबूकवरील पोस्टमध्ये हिजाबविरोधी लिखाण केले होते, तसेच भगव्या उपरण्याचे समर्थन केले होते.

 (सौजन्य : Republic World)

काँग्रेस नेत्याने हिजाबविरोधकांची तुकडे करण्याची दिली होती धमकी !

काही दिवसांपूर्वी मुकर्रम खान या काँग्रेसच्या नेत्याने ‘हिजाबला विरोध करणार्‍यांचे तुकडे तुकडे करून टाकू’, असे विधान केले होते.

याविषयीही चौकशी करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात येत आहे.

हर्षा यांची हत्या मुसलमान गुंडांनी केली ! – कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा

हर्षा यांच्या हत्येविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के.एस्. ईश्वरप्पा म्हणाले, ‘‘बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या निधनाने मला फार दु:ख झाले आहे. हर्षा यांची हत्या मुसलमान गुंडांनी केली आहे.

त्यांचे पूर्वी कधी असे धाडस झाले नव्हते. पुन्हा आम्ही अशा हत्या होऊ देणार नाही. काँग्रेसचे राज्य प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी ‘एका शाळेत विद्यार्थ्यांनी तिरंगा काढून भगवा फडकावल्याचे सांगितले आणि मुसलमानांना भडकावले. यामुळेच हिंसा घडली आहे.’

(म्हणे) ‘ईश्वरप्पा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला जावा !’ – डी.के. शिवकुमार, काँग्रेस

राज्याचे मंत्री ईश्वरप्पा यांच्या आरोपावर डी.के. शिवकुमार यांनी म्हटले की, ईश्वरप्पा वेडी व्यक्ती आहे. त्याची जीभ आणि डोके यांच्याशी काही संबंध नाही. ते निरर्थक बोलत आहेत.

(सौजन्य : ANI News)

त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे आणि भाजपने त्यांना पदावरून हटवले पाहिजे. (मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या काँग्रेसवाल्यांकडून आणखी वेगळ्या प्रतिक्रियेची काय अपेक्षा ! – संपादक)

अंत्ययात्रेच्या वेळी पुन्हा हिंसाचार

हर्षा यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

या वेळी पुन्हा  हिंसाचाराची घटना घडली. या वेळी धर्मांधांनी दगडफेक केली.

काँग्रेसकडून हत्येचा निषेध

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या हत्येचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, आम्ही शांततेवर विश्वास ठेवतो.

या हत्येला जे कुणी उत्तरदायी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे. या घटनेसाठी गृहमंत्र्यांनी त्यागपत्र दिले पाहिजे.