मुलीशी विवाह लावून देण्यास नकार देणार्‍या तिच्या वडिलांची इम्तियाजकडून हत्या !

देशात अल्पसंख्यांक असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

देहली – येथील दयालपूर क्षेत्रामध्ये इम्तियाज नावाच्या युवकाला एका मुलीशी विवाह करायचा होता. त्यास विरोध केल्याने इम्तियाज याने मुलीच्या वडिलांवर गोळीबार करत त्यांची हत्या केली. गोळीबार करून पळत असतांनाच आजूबाजूच्या लोकांनी इम्तियाजला पकडून त्याला मारहाण केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. शौकीन असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून इम्तियाज हा शौकीन यांच्याकडे त्यांच्या मुलीशी त्याचा विवाह लावून देण्यासाठी अनेक मासांपासून मागणी करत होता. १६ फेब्रुवारीला इम्तियाजने शौकीन यांच्याकडे पुन्हा एकदा याविषयी मागणी केली. शौकीन यांनी त्यास नकार दिल्याने इम्तियाजने त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या.