कृष्णराव केळुसकर यांनी मराठीत लिहिलेल्या पहिल्या शिवचरित्राचे कन्नड भाषांतर प्रकाशित
मुंबई – कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी वर्ष १९०६ मध्ये लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठीतील पहिल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या नावाच्या चरित्राचे कन्नड भाषेत भाषांतर करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीला कन्नड भाषेतील चरित्राचे प्रकाशन करण्यात आले.
या चरित्राचा कन्नड अनुवाद चंद्रकांत पोकळे यांनी केला आहे. आय.बी.एच्. प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. साडेसहाशे पानांच्या या चरित्राचे मूल्य साडेतीनशे रुपये आहे. यापूर्वी साकेत प्रकाशनाने मराठी भाषेत या चरित्राचे प्रकाशन केले आहे. सनातनच्या साधिका श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) या कृष्णराव केळुसकर यांच्या नात आहेत.