‘आतंकवादी पाकिस्तान’ला काळ्या सूचीत घालण्याची मागणी
पॅरिस येथे एफ्.ए.टी.ए.च्या कार्यालयाबाहेर निर्वासित अफगाणी आणि उघूर मुसलमानांची निदर्शने
पॅरिस (फ्रान्स) – येथील ‘फायनेंशियल अॅक्शन टास्क फोर्स’ (एफ्.ए.टी.ए.) या संस्थेच्या कार्यालयाबाहेर पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यात पॅरिसमध्ये रहाणारे अफगाण, उघूर आणि हाँगकाँग येथील निर्वासित मुसलमानांचा समावेश होता. त्यांनी या वेळी ‘आतंकवादी पाकिस्तान’ अशा घोषणा दिल्या. ‘पाकला काळ्या सूचीमध्ये घाला’, अशी मागणीही त्यांनी एफ्.ए.टी.ए.कडे केली. एफ्.ए.टी.ए.ने वर्ष २०१८ पासून पाकला आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्यावरून ‘करड्या’ (ग्रे) सूचीमध्ये घातले आहे. यामुळे पाकवर जागतिक स्तरावर अनेक बंधने घातली गेली आहेत. त्याला काळ्या सूचीमध्ये घातल्यास जगातील एकाही देशाकडून पाकशी आर्थिक आणि व्यापारी संबंध ठेवले जाणार नाहीत.
याविषयी निर्वासित पाकिस्तानी पत्रकार ताहा सिद्दीकी यांनी सांगितले की, जगभरात आर्थिक गैरव्यवहारामध्ये पाकची भूमिका, पाककडून आतंकवाद्यांचे आर्थिक पोषण आणि चीनसमवेत त्याची असलेली युती जगजाहीर आहे. याला विरोध करण्यासाठीच फ्रान्समधील नागरिकांनी या निदर्शनांत भाग घेतला.