भाजप पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळी या सणांना विनामूल्य गॅस सिलिंडर आणि विद्यार्थिनींना स्कूटी देणार ! – भाजपचे नेते राजनाथ सिंह यांची घोषणा
असे आमीष दाखवणे भाजपकडून अपेक्षित नाही; कारण निवडणुकीच्या वेळी असे आमीष दाखवणे, ही जनतेला एक प्रकारे दिलेली लाचच आहे, हे भाजपचे नेते जाणतील का ? याऊलट राष्ट्र आणि धर्म यांसाठी काय करणार, हे पक्षाने जनतेला सांगायला हवे ! – संपादक
मनकापूर (उत्तरप्रदेश) – राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळी या सणांच्या वेळी विनामूल्य गॅस सिलिंडर देण्याची घोषणा भाजपचे नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथील प्रचारसभेत केली. यासह त्यांनी विद्यार्थिनींना स्कूटी (दुचाकी) देणार असल्याचीही घोषणा केली.
ग्रेजुएशन करने वाली छात्राओं को स्कूटी देगी बीजेपी सरकार- राजनाथ सिंह https://t.co/cNho6ZUvo8
— Jansatta (@Jansatta) February 19, 2022