पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घाला !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची केंद्र सरकारकडे मागणी
मुळात अशी मागणी करावी लागू नये. केंद्रात भाजपचेच सरकार असतांना आणि गेल्या काही वर्षांपासून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या राष्ट्रविरोधी कारवाया समोर आल्या असतांना केंद्र सरकारने स्वतःहून बंदी घालण्याची आवश्यकता आहे ! – संपादक
गुवाहाटी (आसाम) – आमच्या सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. ही मागणी हिजाबच्या प्रकरणावरून करण्यात आलेली नाही. हा आमचा लोकशाहीतील अधिकार आहे. हिंसाचार आणि कट्टरतावाद यांमधील सहभागामुळे बंदी घातली पाहिजे, अशी माहिती आसामचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
हिजाब मुद्दे पर चल रहे विरोध के बीच इस राज्य के मुख्यमंत्री ने PFI पर रोक लगाने की मांग की है. #PFI #Hijab https://t.co/lyCyOwqZuk
— Zee News (@ZeeNews) February 19, 2022