मडिकेरी (कर्नाटक) येथे हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिंनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला !
महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना ठार मारण्याची धमकी
|
मडिकेरी (कर्नाटक) – हिजाब घालून आलेल्या मुसलमान विद्यार्थिनींना प्रवेश नाकारल्यामुळे येथील एका महाविद्यालयाच्या विजय नावाच्या प्राध्यापकाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याविषयी प्राध्यापकाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. सामाजिक माध्यमांतून ही धमकी देण्यात आल्याने सायबर शाखेच्या पोलिसांकडून याची चौकशी करण्यात येत आहे.
#HijabControversy : छात्राओं को हिजाब पहनने से रोकने पर कर्नाटक में प्रिंसिपल को मिली जान से मारने की धमकी https://t.co/9qcaRXfzDa
— India TV Hindi (@IndiaTVHindi) February 19, 2022
हिजाबच्या मागे आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेचा हात ! – महसूल मंत्री आर्. अशोक यांचा दावा
हिजाबच्या प्रकरणाविषयी राज्याचे महसूल मंत्री आर्. अशोक म्हणाले की, एक लहान शहर असलेल्या उडुपीमध्ये चालू झालेला हिजाबचा वाद एका आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा पोचतो ? विद्यार्थी असे करू शकत नाही. यामागे आंतरराष्ट्रीय जिहादी आतंकवादी संघटनेची मुख्य भूमिका आहे. एका आतंकवादी संघटनेचे हे काम आहे. ही संघटना इराक, इराण आणि पाकिस्तान या देशांत सक्रीय अहे. या प्रकरणी आतंकवादी संबंध उघड करण्याची आवश्यकता असून ते केले जातील.