भारताचा खेळाडू राजवर्धन हंगरगेकर याच्यावर वय लपवल्याचा आरोप !
धाराशिव – नुकत्याच झालेल्या ‘अंडर १९ क्रिकेट विश्वकप’ (Under-19 Cricket World Cup) विजेता संघाचा भाग असलेला भारताचा खेळाडू राजवर्धन हंगरगेकर याच्यावर वय लपवल्याचा आरोप करण्यात आला असून तशी तक्रार भारतीय नियामक क्रिकेट मंडळाकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयकडे लेखी तक्रार केली आहे.
वर्ल्डकप जिंकणाऱ्या 'मराठी' खेळाडूनं केली फसवणूक? BCCIकडं दाखल झाली 'गंभीर' तक्रार! https://t.co/pNr9ahcT32 #BCCI #CSK #Under19WorldCup
— LoksattaLive (@LoksattaLive) February 18, 2022
ओमप्रकाश बकोरिया यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राजवर्धन धाराशिव येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये शिकलेला आहे. पहिली ते सातवीपर्यंत त्याची शाळेत १० जानेवारी २००१ अशी जन्मदिनांक होती, तर आठवीत १० नोव्हेंबर २००२ अशी करण्यात आली. त्यामुळे नुकतेच झालेल्या ‘अंडर १९ वर्ल्ड कप’ दरम्यान राजवर्धनचे वय २१ वर्षे होते, जे नियमबाह्य आहे.