कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाविद्यालयाने हिजाब काढायला लावल्याने प्राध्यापिकेचे त्यागपत्र
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्यांनी देशातूनही निघून जावे, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक
तुमकुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम निकाल येईपर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये कुणीही कोणताही धार्मिक पोशाख घालू नये, असा आदेश दिला आहे. याचे पालन केले जात असतांना हिजाब काढायला लावल्यामुळे तुमकुरू येथील जैन पीयू महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका चांदनी यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले आहे.
(सौजन्य : HW News English)
चांदनी यांनी सांगितले की, गेल्या ३ वर्षांपासून मी या महाविद्यालयात नोकरी करत आहे; मात्र पहिल्यांदाच मला हिजाब काढण्यास सांगण्यात आले. हा नवा निर्णय माझ्या स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे; म्हणूनच मी त्यागपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.