हिंदु स्वस्तिक आणि नाझी स्वस्तिक यांच्यातील आध्यात्मिक भेद !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे त्याचे सहलेखक आहेत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने काही मासांपूर्वी विविध प्रतिकांच्या, विशेषतः हिंदु स्वस्तिक आणि नाझी स्वस्तिक यांच्या संबंधाने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे संशोधन केले आहे. हे संशोधन शोधनिबंधाद्वारे विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरही करण्यात आले आहे. या संशोधनाविषयीची माहिती ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि कॅनडाच्या संसदेमध्ये खलिस्तानवादी शीख नेत्याच्या समर्थकांकडून या दोन्ही स्वस्तिकांवर बंदी घालणारे विधेयक सादर केले आहे, त्यामुळे वरील संशोधनाविषयीच्या माहितीचा संक्षिप्त भाग आमच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु स्वस्तिक आणि नाझी स्वस्तिक यांचा तुलनात्मक अभ्यास
मूळ हिंदु स्वस्तिकात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा, तर नाझी स्वस्तिकात पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळली.
२. हिंदु स्वस्तिक आणि नाझी स्वस्तिक दंडावर धारण केल्याचा परिणाम
या प्रयोगात सहभागी दोघांपैकी पहिल्या व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असल्याने प्रयोगापूर्वीही त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. दुसर्या व्यक्तीमधून चाचणीपूर्वी सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. दंडावर नाझी स्वस्तिक बांधल्यावर पहिल्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ दुपटीने वाढून ५.७३ मीटर झाली. दुसर्या व्यक्तीमध्ये ५ मीटर लांबीची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ निर्माण झाली, तर त्याच्यामधील सकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट झाली.
वरील चाचणीनंतर त्यांच्या दंडावरील नाझी स्वस्तिक काढल्यानंतर, दोन्ही व्यक्ती प्रयोगापूर्वीच्या मूळ स्थितीला येईपर्यंत थांबण्यात आले. मूळ स्थिती आल्यावर त्यांच्या दंडावर हिंदु स्वस्तिक बांधण्यात आले. त्यानंतर २० मिनिटांनी केलेल्या चाचणीत पहिल्या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पूर्णतः नष्ट झालेली आढळली. एवढेच नाही, तर त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, जिची प्रभावळ १ मीटर होती. दुसर्या व्यक्तीची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मूळ ३.१४ पासून ६.२३ मीटर झाली, म्हणजे जवळ जवळ दुप्पट झाली. आपापल्या परीने वरील दोन्ही प्रतिके कशी शक्तीशाली आहेत, हे या प्रयोगातून दिसून आले. नाझी स्वस्तिकाचा ते धारण करणार्यावर प्रचंड नकारात्मक परिणाम होतो, तर प्राचीन भारतीय स्वस्तिकाचा पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो.