कॅनडामध्ये कोरोना निर्बंधांना विरोध करणार्या ट्रकचालकांना अटक
ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणार्या ट्रकचालकांना ओटावा पोलिसांनी अटक केली. या ट्रकचालकांनी जवळजवळ तीन सप्ताहांपासून रस्ताबंद आंदोलन केले होते. सरकारने आंदोलनकर्त्यांना दंड आणि कारागृहात टाकण्याची चेतावणी दिल्याने अमेरिकेच्या सीमेवरील चार ठिकाणांच्या आंदोलकांनी माघार घेतली होती; मात्र आंदोलनाचे मुख्य केंद्र असलेल्या ओटावा शहरातील आंदोलन ट्रकचालकांनी चालूच ठेवले होते.
Police in Canada’s capital are telling protesting truckers who have paralyzed the city for more than two weeks that it’s time to leave https://t.co/Ked69BDSjF
— The Hindu (@the_hindu) February 17, 2022
ओटावा पोलिसांनी १७ फेब्रुवारीपासून शहरातील आंदोलकांना अटक करणे चालू केले.