कर्नाटकात हिजाब घालण्यास मिळाले नाही, तर बांगलादेशात हिंदूंना कुंकू लावण्यास देणार नाही !

बांगलादेशातील धर्मांधांनी धमकी दिल्याची तस्लिमा नसरीन यांची माहिती

  • इस्लामी देशांना तेथील हिंदूंवर आक्रमण करण्याची, त्यांच्या धार्मिक प्रथांवर बंदी घालण्याची संधीच हवी असते. कर्नाटकातील हिजाबचे प्रकरण त्यांना आयतेच मिळाले आहे. त्यामुळे ते असे काहीतरी करण्याची शक्यता नाकारता येणार नाही ! याविषयी भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी तेथील सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
  • भारतात हिजाबचे समर्थन करणारे तथाकथित निधर्मीवादी यावर का बोलत नाहीत ? – संपादक

नवी देहली – बांगलादेशी मुल्ला (मुसलमान) बांगलादेशी हिंदूंना धमकावत आहेत. ‘जर कर्नाटकातील मुसलमानांना हिजाब घालण्याची अनुमती नसेल, तर बांगलादेशी हिंदूंना मुल्ला (मुसलमान) धोतर घालण्यापासून, तसेच कुंकू लावण्यापासून रोखतील, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती बांगलादेशी लेखिता तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून दिली आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी मला मारण्यासाठी गुंड पाठवले होते ! – तस्लिमा नसरीन यांचा आरोप

एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी व बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तस्लिमा नसरीन यांना ‘द्वेषाचे प्रतीक’ म्हटले होते. त्या विधानावर तस्लिमा नसरीन यांनी अन्य एका ट्वीटद्वारे प्रत्युत्तर देतांना ‘ते (ओवैसी) म्हणतात मी ‘द्वेषाचे प्रतीक’ आहे. खरेच ? माझ्यावरील ‘प्रेमापोटी’ त्यांनी भाग्यनगर आणि संभागीनगर येथे मला मारण्यासाठी गुंड पाठवले असावेत!’, असा आरोप केला आहे.