चित्रीकरणाच्या वेळी मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी ४ जणांना अटक

अश्लील व्हिडिओ प्रकरणी जामिनावर असलेल्या गहिना वसिष्ठ यांच्याशी संबंध

मुंबई – एका मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी नरेश पाल, सलीम सैयद, अब्दुल सैयद आणि अमन बर्नलवाल या ४ जणांना अटक करण्यात आली आहे. यांपैकी नरेश पाल हा चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. ५ मास कारागृहात राहिलेली आणि सध्या जामिनावर असलेली अश्लील चित्रपटांची निर्माती गहना वसिष्ठ हिच्याविरुद्ध १ वर्षापूर्वी संबंधित पीडितेने तक्रार केली होती, तसेच तिच्यासोबत काम करतांना सामूहिक बलात्काराचा आरोप केला होता.

वसिष्ठ ही निर्मार्ती आणि दिग्दर्शक असलेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी पीडितेला ‘तुझ्या अंगावर पूर्ण कपडे असतील’, असे सांगण्यात आले होते; प्रत्यक्षात चित्रीकरणाच्या वेळी पीडितेला फसवून तिच्यावर कॅमेर्‍यासमोरच चौघांनी बलात्कार केला. याविषयी वसिष्ठ हिच्याकडे तक्रार केल्यावर तिने पीडितेला ‘या चित्रीकरणासाठी १० लाख रुपये खर्च आला असून हे सर्व करावेच लागेल’, असे सांगितले. त्यानंतर या चित्रपटात काम करणार्‍या नटानेही पीडितेच्या समवेतच्या संबंधांचे चित्रीकरण संकेतस्थळावर प्रसारित केले होते.

यानंतर वसिष्ठ हिला मुलींना बळजोरीने अश्लील चित्रपटात काम करायला लावल्याच्या प्रकरणी फेब्रुवारी २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना या प्रकरणी अटक झाल्यावर वसिष्ठ हिने त्यांची बाजू घेतली होती.