मालेगाव (जिल्हा नाशिक) येथील ‘उर्दू घरा’ला मुस्कान खान हिचे नाव !
‘हिंदूंविरुद्ध लढणारी शूर मुलगी’ अशी मुस्कान खान हिची प्रतिमा निर्माण केली जात असून त्या अनुषंगाने ‘हिंदू हे अल्पसंख्याकांवर आक्रमण करतात’, हे सिद्ध करणारे वातावरण निर्माण करण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र आहे, असेच हिंदूंना वाटते !
(‘उर्दू घर’ म्हणजे उर्दू साहित्याच्या संवर्धनासाठी बांधण्यास आलेली इमारत)
नाशिक – येथील मालेगाव येथील उर्दू घराला कर्नाटकमधील महाविद्यालयात हिजाब घालण्याचे समर्थन करण्यासाठी ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा देत महाविद्यालयात प्रवेश करणार्या मुस्कान खान हिचे नाव देण्यात आले आहे. याविषयीचा ठराव तेथील महापालिकेत संमत झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला. भाजप आणि जनता दल या पक्षांच्या नगरसेवकांनी याला विरोध केला. आरंभी शिवसेनेनेही विरोध केला होता; परंतु शिवसेना ऐनवेळी तटस्थ राहिल्याने महापौर ताहेरा शेख यांनी हा ठराव बहुमताने संमत केला.