हिजाबवाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे माहात्म्य !
धर्मांधांच्या क्लृप्त्यांवर वचक बसवण्यासाठी शासनकर्त्यांनी छत्रपती शिवरायांची नीती अवलंबवावी ! – संपादक
१. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ – ‘धर्माचरणी राजा, त्यामुळे सुखी प्रजा !’
छत्रपती शिवरायांच्या काळात डोकावून पाहिले, तर हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यासाठी महाराजांनी अनेक संघर्षांना तोंड दिल्याचे आढळते. त्यांच्या काळात हिंदूंची मंदिरे आणि हिंदु महिला सुरक्षित होत्या. अफझलखान, शाहिस्तेखान यांसारखे अनेक धर्मांध त्या काळात होते आणि त्यांचा छत्रपती शिवरायांकडून झालेला पाडाव, हा सर्वांच्याच वाचनात आला असेल. ‘तो इतिहास आठवला, तरी हिंदूंची छाती अभिमानाने फुलते’, असा हा राजा होता. त्या काळात समाज सुखी होता. जनतेला न्याय मिळवून देणे, हिंदूंवर अत्याचार करणार्या शत्रूवर चालून जाणे, असे छत्रपती शिवरायांचे धोरण होते. त्यांचे मावळेही त्यांनी तसेच सिद्ध केले होते. अशा राजांचे उदाहरण आणि इतिहास डोळ्यांसमोर ठेवून आताच्या शासनाने प्रयत्न केले, तर हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही.
२. (म्हणे) ‘हिजाब घातला, तर देशात होणारे महिलांवरील बलात्कार थांबतील !’
हिजाबवरून पूर्ण देशात धर्मांधांनी वाद निर्माण केला आहे. धर्मांध महिला अशी मागणी करत आहेत की, आम्हाला डोके आणि मान झाकता यावी, यासाठी हिजाबला अनुमती मिळावी. हिजाब घालूनच आम्ही फिरणार. त्यासाठी धर्मांधांकडून देशात आंदोलने केली जात आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, हिंदु महिलांना साडी आणि कुंकू लावण्याची अनुमती आहे, तर आम्ही हिजाब का घालू शकत नाही ? आणि म्हणे हिजाब घातला, तर देशात होणारे महिलांवरील बलात्कार थांबतील. अत्याचार केवळ मुसलमान महिलांवरच नाही, तर हिंदु महिलांवरही होतात; परंतु तो धर्मांध वासनांधांच्या कुकृत्यांचा परिणाम आहे. ते रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्कार करणार्या पाटलाचा चौरंगा (हात-पाय तोडणे) केल्याच्या घटनेचा आदर्श घ्यायला हवा. त्यांच्या शासनकाळात स्त्री सुरक्षित जीवन जगत होती.
३. हिजाबच्या आडून देशाचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र !
कर्नाटकमधील एका महाविद्यालयात बुरखा घालून आलेल्या धर्मांध विद्यार्थिनीने आजूबाजूला हिंदु युवक असतांना ‘अल्ला हू अकबर’, अशा घोषणा दिल्या. या घोषणा दिल्याने एका धर्मांध संघटनेने तिला पारितोषक घोषित केले आहे. अशा संघटना विद्यार्थीदशेपासूनच मुसलमान मुलींमध्ये कट्टरता निर्माण करत आहेत. कर्नाटकमधील महाविद्यालयात या धर्मांध विद्यार्थिनींनी महाविद्यालयात हिजाब घालता यावा, यासाठी आंदोलन चालू केले आहे.
हिजाब घालण्यासाठी धर्र्मांध महिला अनेक कारणे देत आहेत. पुढे या महिला म्हणतील, ‘हिजाब आमचा अधिकार आहे, तर बुरखा घालण्याची अनुमती द्या.’ त्यानंतर ‘शाळेत नमाज पढण्याची मागणी करतील आणि मग इस्लामी शिक्षण द्या’, ‘शरियत लागू करा’, अशा एकाहून एक भयावह मागण्या केल्या जातील. किंबहुना त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शाळा व्यवस्थापन आणि सरकार यांना भाग पाडले जाईल.
अशांचे मनसुबे ओळखून त्यांना धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे कणखर शासनकर्ते हवेत. शासनकर्त्यांनी साधना केली आणि हिंदूंकडूनही ती करवून घेतली, तर समाजपुरुषाची सात्त्विकता वाढून धर्मांध अशा प्रकारच्या मागण्याच करू धजावणार नाहीत. यासाठीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सर्वांनीच शिवजयंतीला साधना करण्याचा निश्चय करायला हवा !
४. ‘कट्टरता जोपासणारी मागणी करण्यास कुणी धजावणार नाही, अशी उपाययोजना करणे’, हीच छत्रपती शिवरायांना आदरांजली ठरेल !
छत्रपती शिवरायांसारखे शासनकर्ते आणि अनेक थोर संत या भारतभूमीला लाभले. त्यामुळे हिंदु संस्कृती अजून टिकून आहे. या भारताच्या मातीत कुणी हिजाबची मागणी लावून धरून शरीयत कायदा आणण्याची दिवास्वप्ने पहात असेल, तर शासनाने त्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. यासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी शासनकर्त्यांनी या शिवजयंतीदिनी हा दृढनिश्चय केला पाहिजे. ‘भारतातील हिंदु संस्कृती टिकवून ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे’, असे शासनकर्त्यांना वाटले पाहिजे. हिजाब घालण्यासारखी कट्टरता जोपासणारी मागणी करण्यास कुणी धजावणार नाही, अशी उपाययोजना शासनाने केली पाहिजे. हीच या शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना खरी आदरांजली ठरेल !
– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२२)