परकियांच्या भारत विजयाच्या भरतीच्या लाटेला चेतावणी देणारे पहिले राष्ट्रवीर छत्रपती शिवाजी महाराज !
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या ग्रंथाचे दोन विभाग केले आहेत. पहिल्या भागात ते मराठा साम्राज्याचा, म्हणजे हिंदुपदपादशाहीचा उदयास्त सांगतात. त्यांच्या पहिल्या प्रकरणातील पुढील ओळी उद्धृत करणे आवश्यक आहे. ते लिहितात, ‘गजनीच्या महंमदाच्या आक्रमणासमवेत प्रारंभ झालेल्या परकियांच्या भारत विजयाच्या भरतीची लाट वेगाने पुढे पसरून अखिल भारतवर्ष तिच्याखाली बुडून गेले होते. तिच्यामधून ज्यांनी आपले मस्तक वर काढले आणि आपल्या खड्या मराठी स्वरात तिला आज्ञा केली, ‘बस. याच्यापुढे एक पाऊल येशील, तर ध्यानात धर’, असे ते पहिले राष्ट्रवीर छत्रपती शिवाजी महाराज !’
(साभार : ‘धर्मभास्कर’, फेब्रुवारी १९९९)