सौदी अरेबियासह अनेक इस्लामी देशांमध्ये पूर्ण चेहर्‍याच्या बुरख्यावर बंदी ! – तस्लिमा नसरीन

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह वापरण्यापासून परावृत्त करणे चांगले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा किंवा पूर्ण चेहर्‍याच्या बुरख्याला अनुमती दिली जाऊ नये. अनेक इस्लामी देशांनी पूर्ण चेहर्‍याच्या बुरख्यावर बंदी घातली आहे. ‘इस्लामचे जन्मस्थान असलेल्या सौदी अरेबियानेही महिलांना हिजाब आणि बुरखा घालण्याची आवश्यकता नाही’, असे घोषित केले आहे, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.