अरुणाचल प्रदेश येथे ट्रक दरीत कोसळल्याने दिंडोरी (नाशिक) येथील सैनिकास वीरमरण !
नाशिक – अरुणाचल प्रदेशमध्ये देशाच्या संरक्षणार्थ सेवा बजावत असतांना जिल्ह्यातील दिंडोरी येथील प्रसाद क्षीरसागर यांना १४ फेब्रुवारी या दिवशी अपघाती वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण आणि भाऊ, असा परिवार आहे. या घटनेने दिंडोरी शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्रसाद क्षीरसागर हे अरुणाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत होते. सैन्यदलाच्या कॅम्पमधून सैनिकी ट्रकद्वारे आपल्या सहकार्यांसमवेत सेवेच्या ठिकाणी जात असतांना ट्रक दरीत कोसळल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला.