हे दुर्गामाते, आता तरी घे धाव झडकरी ।
हिंदु राष्ट्र स्थापनेचा कालावधी पुढे सरकणार हे मला मे २०२१ मध्ये प्रकर्षाने जाणवले. तेव्हा श्री दुर्गादेवीला माझ्याकडून पुढीलप्रमाणे आळवले गेले.
घे धाव झडकरी ।
हे माते, आता तरी हो प्रकट अन् तार आम्हा या संसारी ।। धृ ।।
वाजव आता शंख, दुंदुभू दे नभांगी ।
तो क्षण पकड झडकरी ।
कडकडू दे वीज वरचे वरी ।। १ ।।
त्रिभुवनाची एकवटू दे शक्ती सारी ।
उमटू दे क्षणात ललकारी ।
ये माते, धाव घे भूवर सत्वरी ।। २ ।।
सरली आता कवाडे सारी ।
दुर्जनतेचे फुटले पेव, गर्जती दिशा चारी ।। ३ ।।
आम्ही झालो हीन दीन, आम्हा कोण तारी ? ।
सार्यांना केवळ तूच गे आधार ।
आलोे तुझ्या दारी ।। ४ ।।
सृष्टीचे चैतन्य तूच नित्य गे आकारी ।
जरी माझे शब्द ते विकारी ।
माते, उमटू दे स्वर ते, तुझ्या ममतेच्या पदरी ।। ५ ।।
श्री दुर्गामाते, तुझ्यावीण आम्हा कोण उद्धारी ।
माते, आता तरी घे धाव झडकरी ।। ६।।’
– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (२५.१२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |