७६५ विचारवंतांकडून खुले पत्र लिहून हिजाबचे समर्थन !
या विचारवंतांना काश्मीरमध्ये हिंदूंच्या वंशसंहाराविषयी, त्यांच्या पुनर्वसनाला जिहाद्यांकडून होत असलेल्या विरोधाविषयी आणि देशात विविध ठिकाणी हिंदूंवर धर्मांधांकडून होत असलेल्या आक्रमणाविषयी अनावृत्त पत्र लिहावेसे का वाटले नाही ?, याचे उत्तर ते देतील का ? – संपादक
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यात चालू असलेल्या हिजाबवरील वादाच्या प्रकरणी अधिवक्ता, कायद्याचे विद्यार्थी, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अशा ७६५ जणांनी खुले (अनावृत्त) पत्र लिहिले आहे. यात त्यांनी ‘हिजाब घालण्यापासून रोखणे हा मुसलमानांच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन आहे’, असा दावा केला आहे. (मुसलमानांच्या कथित घटनात्मक अधिकाराविषयी जागरूक असणारे कधी हिंदूंच्या घटनात्मक अधिकाराविषयी बोलतात का ? – संपादक) यात म्हटले आहे, ‘प्रशासनाने आदेश देऊन मुसलमान विद्यार्थिनी आणि कर्मचारी यांना शाळा अन् महाविद्यालये येथे हिजाब घालून जाण्यापासून रोखण्याच्या प्रकारामुळे आमची मान लज्जेने खाली गेली आहे.’ (‘असे बोलण्यास या विचारवंतांना लाज कशी वाटत नाही ?’, असा प्रश्न धर्मांधांनी छळ केलेल्या पीडित हिंदूंच्या मनात येत असणार ! – संपादक)
‘हम शर्मिंदा हैं’: बुर्का के समर्थन में 765 वकील, शिक्षाविद और सामाजिक कार्यकर्ताओं ने लिखा पत्र, हिजाब को बताया संवैधानिक अधिकार#KarnatakaHijabRowhttps://t.co/ssXI2LlO2Z
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 16, 2022