हिजाबच्या विरोधात विहिंपकडून ताजमहालमध्ये हनुमान चालीसाच्या पठणाचा प्रयत्न !
आगरा (उत्तरप्रदेश) – विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हिजाबच्या विरोधात येथील ताजमहालमध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना कह्यात घेतले. त्यांना हरिपर्वत पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथेही त्यांनी हनुमान चालीसाचे पठण केले. त्यांच्याकडून निवेदन लिहून घेण्यात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
आगरा: ताजमहल में हनुमान चालीसा का पाठ करने जा रहे विहिप कार्यकर्ताओं को पुलिस ने रोका, थाने में बैठाया#Agra #Tajmahal #HanumanChalisa https://t.co/54DqR30Rkt
— Amar Ujala (@AmarUjalaNews) February 15, 2022
विहिंपच्या ब्रज क्षेत्राचे उपाध्यक्ष आशिष आर्य यांच्या नेतृत्वात हनुमान चालीसाचे पठण करण्याची योजना आखण्यात आली होती. आशिष आर्य यांनी सांगितले की, प्रत्येक शैक्षणिक संस्थेला तिचा गणवेश असतो; मात्र काही लोक हिजाबचा संदर्भ जाणूनबुजून धार्मिक भावनांशी लावून जातीय वाद भडकवण्याचे काम करत आहेत.