ब्रिटनचे राजकुमार कारागृहात जाण्यापासून वाचण्यासाठी बलात्कारित महिलेला ९१४ कोटी रुपये देणार !
ब्रिटनच्या राजघराण्यातील मंडळी ही चारित्र्यहीन आणि व्यभिचारी कृत्यांसाठीच कुप्रसिद्ध आहेत. प्रिन्स अँड्र्यू यांच्या या कृतीतून राजघराण्यावर आणखी एक कलंक लागला. अशा राजघराण्याचा भारतियांनी उदोउदो करू नये, एवढेच ! – संपादक
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे ६१ वर्षीय राजकुमार प्रिन्स अँड्र्यू आणि त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार करणार्या व्हर्जिनिया गिफ्रे यांच्यात एक करार झाला आहे. या करारानुसार प्रिन्स अँड्र्यू हे गिफ्रे यांना हानीभरपाई म्हणून ९१४ कोटी ४० लाख रुपये देणार आहेत. यामुळे ते कारागृहात जाण्यापासून वाचणार आहेत. ‘१७ वर्षांची असतांना अँड्र्यू यांनी माझ्यावर तीन वेळा बलात्कार केला’, अशी तक्रार गिफ्रे यांनी केली होती. गिफ्रे यांचे अधिवक्ता डेव्हिड बोईस यांनी मॅनहॅटनमधील फेडरल न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांतील उल्लेखानुसार, दोन्ही बाजूंच्या अधिवक्त्यांनी खटल्यात न्यायालयाबाहेर तोडगा निघाल्याचे सांगितले आहे. यानंतर दोन्ही पक्षांचे अधिवक्ते खटला रहित ठरवण्यासाठी याचिका प्रविष्ट करणार आहेत.
The settlement, which includes an undisclosed payment, is revealed on February 15, in a filing in Manhattan federal court. https://t.co/vyt6z6lbo3
— Rappler (@rapplerdotcom) February 16, 2022
प्रिन्स अँड्र्यू हे ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पुत्र आहेत. एलिझाबेथ यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून प्रिन्स अँड्र्यू यांना आर्थिक साहाय्य केल्याचे सांगितले जात आहे.