पुणे येथील एका पोलीस उपनिरीक्षकानेच अडीच लाखांची खंडणी वसूल केली !
|
लोणी काळभोर (जिल्हा पुणे) – येथील एका पोलीस उपनिरीक्षकाने ‘होमगार्ड’चे साहाय्य घेत मलठण फाट्यावर एका टँकरचालकाला अडीच लाख रुपयांची खंडणी वसूल करून लुटले. खंडणीच्या या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. चालक गरूड यांनी या प्रकरणी अपहरण आणि खंडणीची तक्रार देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले की, प्राथमिक अन्वेषणात या प्रकरणात एक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि ‘होमगार्ड’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.