चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

आमदार श्री. मंगेश चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांना आश्रमातील अद्वितीय संग्रहालयाची माहिती सांगतांना  सनातनचे साधक श्री. गिरीजय प्रभुदेसाई

रामनाथी (गोवा) – चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथील भाजपचे आमदार श्री. मंगेश चव्हाण यांनी ११ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे भाऊ श्री. गोपाळ चव्हाण, नगरसेवक श्री. भास्कर पाटील आणि श्री. योगेश खंडेलवाल, श्री. भैय्यासाहेब आनंदराव पाटील अन् युवा सरपंच नीलेश जाधव आणि अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते. सनातनचे साधक श्री. गिरीजय प्रभुदेसाई यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म कार्याविषयी माहिती दिली. ‘आश्रम पाहून भारावून गेलो. येथे सकारात्मकता शिकता आली’, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. ‘आश्रम पाहून अतिशय प्रसन्न वाटले’, असा अभिप्राय श्री. भैय्यासाहेब आनंदराव पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी दिला.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी आमदार मंगेश चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांच्याशी राष्ट्र अन् धर्म यांच्या संदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, ‘‘तुमच्याकडे राष्ट्र आणि धर्म यांच्यासंदर्भात काही विषय असतील, तर आम्हाला द्या. आम्ही ते पुढे नेऊ. तुम्हाला कधीही साहाय्य लागले, तर सांगा. आम्ही ते करण्यास सिद्ध आहोत.’’ श्री. रमेश शिंदे यांनी आमदार श्री. मंगेश चव्हाण यांना हिंदु जनजागृती समितीचा ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ आणि प्रसाद दिला.