नागपूर येथे सडक्या शेंगदाण्याला रंगवून ‘पिस्ता’ म्हणून विकणार्यांवर कारवाई !
|
नागपूर – येथे काही भेसळखोरांनी ९० रुपये किलोच्या सडक्या शेंगदाण्याला रंगवून, सुकवून त्याला पिस्ता बनवले आहे. काही दक्ष नागरिकांनी याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांना दिली. त्यानंतर नागपूर येथील बाबा रामसुमेरनगर परिसरातील एका इमारतीत धाड घालून ६२१ किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केला आहे.
शेंगदाण्याला हिरव्या आणि लाल रंगात रंगवून, उन्हात अनेक दिवस सुकवून, चाळणीने स्वच्छ करून पिस्ता किंवा बदाम सारखे बनवले जाते. नंतर यंत्राच्या साहाय्याने त्याची कात्रण (चिप्स) करून बाजारात १ सहस्र ५०० ते १ सहस्र ७०० रुपये किलोने पिस्ता किंवा बदामाची कात्रणे म्हणून मिठाई उत्पादकांना विकली जात आहेत. हे उद्योग अनेक मास राजरोसपणे चालू होते.