धर्मनिरपेक्ष देशात धर्मावर आधारित ‘हलाल’ अर्थव्यवस्था कशाला हवी ? – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात जागृतीसाठी प्रतिष्ठित हिंदूंसाठी आयोजित ‘ऑनलाईन’ कार्यक्रम
देश निधर्मी असतांना धर्माधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था का अंगिकारली जाते ?
कोल्हापूर – भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने धर्मावर आधारित असणारी ‘हलाल’ अर्थव्यवस्था असण्याची आवश्यकता नाही. या संदर्भात प्रत्येकाने त्यांच्या स्तरावर विरोध करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ‘नेशन फर्स्ट ग्रुप’चे पुणे येथील मुख्य समन्वयक श्री. सुनील भोसले यांनी पुढाकार घेऊन एका ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजक श्री. सुनील भोसले आणि श्री. उमेश पाटील म्हणाले, ‘‘सर्व हिंदूंना हा विषय कळलाच पाहिजे म्हणून आमच्या परीने आम्हाला शक्य ते सर्व प्रयत्न आम्ही करू आणि आणखी अशा कार्यक्रमाचे आयोजन करु.’’ |
‘हलाल’ अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून चालणारी अर्थव्यवस्था हा विषय गंभीर आहे. त्यासाठी जागृती झाली पाहिजे’, या तळमळीमुळे श्री. सुनील भोसले यांनी या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या संपर्कातील प्रतिष्ठित हिंदूंसाठी केले होते. या कार्यक्रमात विविध महाविद्यालयांत कार्यरत प्राचार्य, उद्योजक, तसेच बहुराष्ट्रीय आस्थापने येथे कार्यरत असलेले अधिकारी असे अनेक जण उपस्थित होते. मार्गदर्शन झाल्यावर उपस्थितांपैकी अनेकांनी ‘याविषयी जागृती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू’, ‘आम्हाला हा विषय ठाऊक नव्हता. तुम्ही पुष्कळ मोठे कार्य करत आहात’, ‘आम्ही या विषयाचा अभ्यास करून परिचितांमध्ये मांडतो’, असे सांगितले.