शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) उत्तीर्ण असूनही २१ शिक्षकांनी पात्रतेसाठी दिले पैसे !
आत्मविश्वास नसलेले असे शिक्षक मुलांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. – संपादक
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण असूनही २१ शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिल्याची माहिती उघड झाली आहे. शिक्षक पात्रता घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांची पडताळणी करतांना सायबर पोलिसांना ही माहिती मिळाली आहे. आत्मविश्वास नसल्याने उत्तीर्ण होण्यासाठी या शिक्षकांनी लाच दिली. त्यामुळे या शिक्षकांनाही पात्र परीक्षार्थींच्या सूचीतून वगळण्यात आले आहे.
टीईटी नकली प्रमाणपत्रातून ५ जणांनी २३४ कोटी रुपयांहून अधिक पैसे कमावल्याचा अंदाज आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पडताळणी न करता शिक्षणाधिकार्यांनी प्रमाणपत्र स्वीकारल्याचे उघड झाले आहे. ज्या शिक्षणाधिकार्यांनी अशी पडताळणी न करता ही प्रमाणपत्रे घेतली ते शिक्षणाधिकारी आता रडारवर आहेत, तर ७ सहस्र ९०० उमेदवारांकडून २ ते ३ लाख रुपये वसूल केल्याची माहिती उघड होत आहे. या प्रकरणी आरोपींनी उमेदवारांना टपालाने पाठवलेली ३०० बनावट प्रमाणपत्रे पोलिसांनी हस्तगत केली असून आतापर्यंत ७ सहस्र ९०० जणांना पात्र केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर यांना अटक झाली आहे. पसार एजंटचा शोध चालू आहे.