मावळ (जिल्हा पुणे) येथील ऐतिहासिक लेण्यांची पडझड !

  • ऐतिहासिक वारसांकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. ऐतिहासिक वारसांकडे दुर्लक्ष करणारे पुरातत्व विभाग काय कामाचा ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक

  • येणार्‍या पिढीवर गड आणि लेण्या यांच्या माध्यमातून इतिहासाचे महत्त्व बिंबवणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन शासनाने पुढाकार घ्यावा, हीच दुर्गप्रेमींची मागणी आहे. – संपादक 

टाकवे बुद्रुक (जिल्हा पुणे) – मावळ तालुक्यातील लेण्या, तसेच गड हा ऐतिहासिक वारसा मावळला मिळालेल्या अनमोल ठेवींपैकी एक आहे. मावळ येथे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, राजमाची, ढाकगड हे गड, तर कार्ला, भाजे, बेडसे, घोरावडेश्वर या मुख्य लेण्या आहेत; मात्र दुर्दैवाने या लेण्यांची काही ठिकाणी पडझड झाली असून काही ठिकाणी चिरा पडल्या आहेत.

इतिहासप्रेमी संतोष दहिभाते म्हणाले की, लेण्यांकडे दुर्लक्ष होत असून या लेण्यांचे संवर्धन आणि काही ठिकाणी झालेली पडझड दुरुस्त करून मावळ येथील ऐतिहासिक लेण्यांचा वारसा जपण्याची मोठी आवश्यकता आहे. मावळला लाभलेल्या ऐतिहासिक वारशामुळे परदेशातही मावळची ओळख आहे. मावळ येथील इतर अपरिचित लेण्यांकडे बर्‍याच जणांचे पाय वळतांना दिसत नाहीत. मावळ येथील अशा लेण्यांचा विकास आणि जतन होणे पुष्कळ आवश्यक आहे.