वाघाच्या कातड्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची निर्दोष सुटका
कातडे वाघाचे नाही, तर कुत्र्याचे असल्याचे उघड !
कातडे वाघाचे आहे कि कुत्र्याचे, हे पोलिसांना आरोपींना अटक करतांना कळले नाही कि नंतर यात आपोआप पालट झाला ? हे एक कोडेच आहे ! – संपादक
छिंदवाडा (मध्यप्रदेश) – वाघाच्या कातड्याची तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ जणांची येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ते वाघाचे नाही, तर कुत्र्याचे कातडे असल्यावरून या आरोपींची सुटका करण्यात आली. छिंदवाडा जिल्ह्यात २२ जुलै २०१७ या दिवशी ही घटना घडली होती. ‘स्कूल ऑफ वाईल्ड लाईफ फारेंसिक अँड हेल्थ’ संस्थेद्वारे कह्यात घेतलेल्या कातड्याचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात हे कातडे वाघाचे नसून कुत्र्याचे आहे, असे म्हटले होते.