कोर्नवॉलच्या राणी कॅमिला यांना झाला कोरोनाचा संसर्ग !

कोर्नवॉलच्या राणी कॅमिला

लंडन (इंग्लंड) – कोर्नवॉलच्या राणी कॅमिला यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे पती तथा ‘वेल्स’चे राजकुमार यांना संसर्ग झाला होता. इंग्लंडच्या शाही घराण्यात राणी एलिझाबेथ यांच्यानंतर कॅमिला यांना सर्वोच्च स्थान आहे.