लवकरच सांगली-कोल्हापूर ‘पॅसेंजर रेल्वे’ चालू होणार ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

कोल्हापूर, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २२ मासांपासून सांगली-कोल्हापूर ही ‘पॅसेंजर रेल्वे’ सेवा बंद आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग अल्प होत असल्याने रेल्वे विभागातील प्रमुखांशी चर्चा करून कोल्हापूर-सांगली मार्गावर ‘पॅसेंजर रेल्वे’ लवकरात लवकरात चालू केली जाईल, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करून दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र रेल प्रवासी ग्रुपने दिलेल्या निवेदनावर मंत्री पाटील यांनी ही माहिती दिली आहे. ही रेल्वे चालू झाल्यास सामान्य प्रवाशांची सोय होणार आहे.