साध्वी प्रज्ञासिंह यांना ‘व्हिडिओ कॉल’ करून ‘ब्लॅकमेल’ करणार्या दोघांना अटक
व्हॉट्सअॅप’वर अश्लील चित्रेही पाठवली
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना ‘ब्लॅकमेल’ केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी राजस्थानच्या भरतपूर येथून वारीस आणि रवीन यांना अटक केली आहे. खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना एका मुलीने भ्रमणभाषवर ‘व्हिडिओ कॉल’ करून स्वतःचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला असता साध्वींनी भ्रमणभाष बंद केला. त्यानंतरही पुनःपुन्हा भ्रमणभाष येत होता, तसेच ‘व्हॉट्सअॅप’वर अश्लील चित्र पाठवून त्याद्वारे ‘ब्लॅकमेल’ करण्याचा प्रयत्न केला होता.
MP police arrest Raveen and Waris from Rajasthan, who blackmailed BJP MP Sadhvi Pragya Thakur using obscene videos on WhatsApphttps://t.co/3pdU5y7P97
— OpIndia.com (@OpIndia_com) February 14, 2022