आरोपी सगाया मॅरी जामिनावर सुटल्यावर द्रमुक पक्षाच्या आमदाराकडून स्वागत
(टीप : द्रमक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड प्रगती संघ))
तंजावर (तमिळनाडू) येथील लावण्या हिच्या आत्महत्येचे प्रकरण
ढोंगी नास्तिकतावादी द्रमुककडून नेहमीच हिंदुद्वेष प्रकट करण्यात येत असतो, त्यातलाच हा एक प्रकार आहे. हे तमिळनाडूतील हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक
तंजाबर (तमिळनाडू) – येथील कॉन्व्हेंट शाळेकडून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास दबाव आणल्याने लावण्या या विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणी शाळेच्या वसतीगृहाच्या व्यवस्थापक (वॉर्डन) सागया मॅरी यांना अटक करण्यात आली होती. तिची जामिनावर सुटका करण्यात आल्यानंतर द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे आमदार इनिनो इरुदराज यांनी शाल देऊन तिचे स्वागत गेले. त्यांनी फेसबूकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘वार्डन मॅरी यांनी गरीब मुलांसाठी चांगले काम केले आहे. त्यांनी मुलांसाठी स्वतःला समर्पित केले आहे. (द्रमुकचे आमदार मुलांचे धर्मांतर करणार्यांचा सत्कार करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) एका घटनेच्या प्रकरणी त्यांना तंजावर जिल्ह्यातील थिरुकट्टुपल्ली मायकलपट्टी येथे अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने मुक्त केल्याचे मला समजल्यावर मी त्रिची येथील केंद्रीय कारागृहाबाहेर गेलो आणि त्यांचे स्वागत केले. न्यायाचा विजय होईल. आपल्याला धार्मिक सद्भावनेसाठी काम करत राहिले पाहिजे.’
DMK MLA welcomes Lavanya case accused Sagaya Mary outside prison#LavanyaSuicideCase https://t.co/uPj8R93tEW
— TheNewsMinute (@thenewsminute) February 14, 2022