काश्मीरचा प्रश्न सुटेपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यात अणूयुद्धाची भीती ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान
काश्मीरचा प्रश्न भारताने नाही, तर पाकने निर्माण केला आहे. त्याने त्याचा काश्मीरवरील दावा सोडून द्यावा आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावा ! – संपादक
इस्लामाबाद (पाकिस्तान) – जोपर्यंत काश्मीरचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणूयुद्धाची भीती कायम रहाणार आहे, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकमधील ‘जियो टीव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचा दावा इम्रान खान यांनी केला.
इम्रान खान म्हणाले की, मी पाकिस्तानमध्ये सत्तेत येताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काश्मीरच्या प्रश्नावर चर्चा केली होती. मी त्यांना म्हणालो होतो की, जर तुम्ही एक पाऊल पुढे आलात, तर मी दोन पावले पुढे येईन. (पाक काश्मीरमधील जिहादी आतंकवाद का थांबवत नाही ?, याविषयी इम्रान खान का बोलत नाहीत ? – संपादक)