शरीयतमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा अधिकार नसतांना मुलीने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा कशा दिल्या ?
कर्नाटकातील हिजाबच्या प्रकरणात केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांचा प्रश्न
आरिफ महंमद खान हे मुसलमान विचारवंत आणि अभ्यासक आहेत. त्यांचे विचार भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना पचनी पडणे अशक्य आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक
नवी देहली – हिजाबच्या (मुसलमान महिलांनी डोके आणि चेहरा झाकण्यासाठी वापरलेल्या वस्त्राच्या) नावावर वाद घालणारे काही जण सातत्याने शरीयतचा हवाला देत आहेत. ज्या देशात शरीयत लागू नाही, त्या देशात मुसलमान राहू शकत नाहीत, असे शरीयत कायदा सांगतो. इस्लाममध्ये महिलांच्या आवाजावरही बंधने आहेत. शरीयतमध्ये म्हटले आहे, ‘मुलीला सार्वजनिक ठिकाणी स्वतःचा आवाज काढण्याचा अधिकार नाही.’ यामुळेच कर्नाटकातील महाविद्यालयामध्ये ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देण्याचे मुलीने केलेले कृत्य चुकीचे आहे. जर खरोखर शरीयतला मानायचे असेल, तर संपूर्ण माना अथवा सोडून द्या, असे सांगत केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये घरचा अहेर दिला आहे. कर्नाटकातील एका महाविद्यालयात बुरखाधारी मुलीला हिंदु विद्यार्थ्यांनी वैध मार्गाने विरोध केल्यावर तिने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
केरल के राज्यपाल आरिफ मोहम्मद खान ने कहा कि इस्लाम में तो महिलाओं को चिल्लाने तक की मनाही है, फिर लड़की ने स्कूल में अल्लाह हू अकबर का नारा क्यों लगाया.#HijabRow https://t.co/jCe8N0E6FE
— Zee News (@ZeeNews) February 14, 2022
राज्यपाल आरिफ महंमद खान पुढे म्हणाले की,
१. इस्लामने त्याच्या पुस्तकांमध्ये म्हटले आहे की, हिजाब इस्लाममध्ये अनिवार्य नाही. यामुळे हिजाबची तुलना शिखांच्या केस, कडे, कृपाण (लहान चाकू) यांच्याशी होऊ शकत नाही. देशात तीन तलाक रहित झाल्यामुळे काही जण अप्रसन्न आहेत आणि ते असे वाद निर्माण करण्याचे षड्यंत्र रचत आहेत.
२. ‘मुसलमान मुलींना शिक्षण मिळत आहे कि नाही ?’, हे आपण का पहात नाही ? किती मुसलमान मुली शाळेत जात आहेत ? किती मुली आय.ए.एस्. आणि आय.पी.एस्. नोकरीमध्ये निवडल्या जात आहेत ? देशाची लोकसंख्या १२५ कोटी आहे. त्यांतील काही मूठभर महिला हिजाबच्या संदर्भात बोलत आहेत. त्यांना प्रसिद्धी देऊन असे सांगू शकत नाही की, तो सर्वांचा आवाज आहे.
३. एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘एक दिवस हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान होईल’, असे म्हटले होते. त्यावर राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी म्हटले, ‘ही केवळ बडबड आहे. देश ज्याला निवडणार, तोच देशाचा पंतप्रधान होईल.’