भारतरत्न स्वरसम्राज्ञीला हीच श्रद्धांजली वहातो ।
श्री मंगेशाची अखंड कृपा आहे ज्यांचेवर ।
त्यातील एक सुप्रसिद्ध घराणे मा. दिनानाथ मंगेशकर ।। १ ।।
पिताश्रीही लाभले देवासम नावाप्रमाणे दिनानाथ ।
दोन्ही अर्थाने ते होते दिनानाथ अन् दीनानाथ (टीप) ।। २ ।।
अशा वंदनीय दिनानाथांची संगीतरत्ने ही पहा ।
लता, आशा, उषा, मीना, हृदयनाथ अलौकिक हा ।। ३ ।।
संगीत रत्नांतील एक प्रसिद्ध पावल्या भारतरत्न म्हणूनी ।
आदरणीय स्वरसम्राज्ञी लतादीदी होत्या बहुगुणी ।। ४ ।।
संगीत जागवत त्यांनी परमोच्च शिखर गाठले ।
‘सप्तसूर माझे श्वास अंतरीचे’ हेच त्यांनी शिकवले ।। ५ ।।
मंगेशकर कुटुंबीय होते स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त ।
जे खरे देशप्रेमी, तेच असतात सावरकर भक्त ।। ६ ।।
धर्म, कुल अन् देश यांची शान वाढवली या स्वरसम्राज्ञीने ।
देश सुपुत्री तथा कुलदीपिका असे सर्वार्थाने ।। ७ ।।
वंदनीय आदरणीय लतादीदींना ही शब्दसुमने अर्पितो ।
भारतरत्न स्वरसम्राज्ञीला हीच श्रद्धांजली वहातो ।। ८ ।।
टीप : • दिनानाथ – तेज किंवा ज्ञान यांचे उपासक • दीनानाथ – गरिबांविषयी कळवळा असलेले
– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ६९ वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (९.०२.२०२२)