उरळी कांचन (जिल्हा पुणे) येथे ‘शिववंदना’ उपक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची करून देण्यात आली ओळख !

उरळी कांचन (जिल्हा पुणे) – पुणे-सोलापूर रस्त्यावरील डाळींब (उरुळी-कांचन) गावामधील धर्मप्रेमी सर्वश्री शुभम म्हस्के आणि ऋषिकेश भाले यांनी गेल्या मासापासून ‘शिववंदना’ हा उपक्रम चालू केला आहे. हे दोघेही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाला जोडतात. ‘समितीचे कार्य गावातील तरुणांना समजावे, त्यांना धर्मशिक्षण मिळण्यासह धर्मावर होणारे आघात समजावेत’, यांसाठी श्री. म्हस्के आणि श्री. भाले यांनी स्वतःहून समितीच्या कार्यकर्त्यांना गावामध्ये आमंत्रित केले होते.

६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशांक सोनवणे यांनी समितीच्या कार्याची माहिती, धर्मशिक्षणाची आवश्यकता आणि साधनेचे महत्त्व हा विषय उपस्थितांना सांगितला. समितीचे श्री. योगेश डिंबळे यांनी ‘व्हॅलेंटाईन-डे’ या पाश्चात्त्य कुप्रथेचे अंधानुकरण का करू नये ? याविषयी उपस्थितांचे प्रबोधन केले. या वेळी हडपसर येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी श्री. सचिन घुले हेही सेवेत सहभागी झाले. या कार्यक्रमात गावातील अनेक युवक-युवतींनी सहभाग नोंदवला. या वेळी श्री. म्हस्के आणि श्री. भाले यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा श्रीफळ देऊन सत्कारही केला.

वैशिष्ट्यपूर्ण

१. मासातून एकदा समितीच्या वर्गातून धर्मशिक्षण मिळावे, अशी इच्छा उपस्थितांनी व्यक्त केली.

२. आयोजकांनी समितीच्या वतीने सिद्ध करण्यात येणार्‍या गुढीपाडव्याच्या १५० शुभेच्छापत्रांची मागणी केली असून गावामध्ये त्याच्या वितरणाचे नियोजन केले आहे.