संस्कृती रक्षणाच्या कार्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ! – गुरुराज प्रभु, सनातन संस्था

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने रुद्रप्रयाग विद्या मंदिरातील शिक्षकांना करण्यात आले मार्गदर्शन !

श्री. गुरुराज प्रभु

प्रयाग – संस्कृती रक्षणाच्या कार्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हिंदु संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर अंकित करणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गुरुराज प्रभु यांनी केले. प्रयागमधील रुद्रप्रयाग विद्या मंदिर येथे ‘आनंदी आणि तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’, या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी श्री. गुरुराज प्रभु यांनी ‘जीवनात तणाव का निर्माण होतो ? सुख-दुःखाची कारणे, अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाची अर्थात् साधनेची आवश्यकता’ आदी विषयावर मार्गदर्शन केले.

या वर्गास उपस्थित असलेल्या रुद्रप्रयाग विद्या मंदिराच्या शिक्षकांनी विषय एकाग्रेतेने ऐकून शंकांचे निरसन करून घेतले. ‘अशा प्रकारचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळावे’, अशी इच्छा शिक्षकांनी व्यक्त केली.

रुद्रप्रयाग विद्यामंदिराचे व्यवस्थापक श्री. सत्येंद्र द्विवेदी यांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा अभिप्राय

श्री. सत्येंद्र द्विवेदी
  • श्री. सत्येंद्र द्विवेदी स्वत: धर्माभिमानी असून ते नियमित साधना करतात. ते प्रत्येक एकादशीला कोणत्याही परिस्थितीत प्रयागहून वृंदावन येथे श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी नियमित जातात.
  • श्री. द्विवेदी यांच्याशी झालेल्या पहिल्याच भेटीत त्यांना सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याविषयी अवगत करण्यात आले. ते कार्य ऐकून श्री. द्विवेदी प्रभावित झाले. त्यांनी एकूण १४५ ग्रंथांची मागणी केली. याचसमवेत त्यांनी दुसर्‍याच दिवशी शिक्षकांसाठी अभ्यासवर्ग घेण्यास साधकांना निमंत्रित केले.
  • सनातन संस्थेचे कार्य ऐकून श्री. सत्येंद्र द्विवेदी म्हणाले, ‘‘यापुढे संस्थेच्या कोणत्याही कार्यात माझा तन, मन आणि धन यांद्वारे सहभाग असेल.’’