समष्टी साधना चांगली होण्यासाठी व्यष्टी साधनेचा पाया पक्का असणे आवश्यक !
परात्पर गुरु डॉक्टरांचे राष्ट्राविषयी मार्गदर्शन !
‘ईश्वराशी एकरूप होण्यासाठी समष्टी साधना करावी लागते; कारण ईश्वराचे खरे स्वरूप व्यापक आहे आणि ते समष्टीमध्ये आहे. एखाद्याला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल, तर त्याला प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, अशा सर्व स्तरांचे शिक्षण टप्प्याटप्प्याने घ्यावे लागते. त्याप्रमाणे समष्टी साधना करण्यासाठी व्यष्टी साधनेचा पाया पक्का करणे आवश्यक असते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.२.२०२२)