माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
रामनाथी (गोवा) – नवी मुंबई येथील माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी पणजी (गोवा) येथील व्यावसायिक प्रकाश हरिभाऊ दळवी, तसेच श्री. विजय शेलार यांनी ११ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. सनातनचे साधक श्री. सागर निंबाळकर यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म कार्याविषयी माहिती दिली. ‘आश्रम अप्रतिम असून येथील वातावरण प्रसन्न आहे’, असे उद्गार श्री. नरेंद्र पाटील यांनी काढले.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी श्री. नरेंद्र पाटील यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी श्री. नरेंद्र पाटील म्हणाले, ‘‘देवतांचे विडंबन रोखण्यासाठी काही कायदा करता येईल का ?, यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना पत्र लिहून एखादी सार्वत्रिक बैठक घेण्यासाठी प्रयत्न करतो. यासाठी न्यायालयीन मार्गानेही प्रयत्न करणार आहे.’’
श्री. रमेश शिंदे यांनी त्यांना ‘धर्मशिक्षण फलक’ आणि ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ हे ग्रंथ आणि प्रसाद दिला.