नागपूर येथे शाळा बंद असतांना बालविवाहाचे प्रमाण वाढले, ११ प्रकरणे उघडकीस !
महिला कल्याण विभागाने केलेली कारवाई !
नागपूर – कोरोना संसर्गाच्या काळात शाळा बंद असल्याने पालक स्वतःच्या पाल्याला वैतागले होते. त्यामुळे पालकांनी बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा असतांनाही घरात बसलेल्या मुलींचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बालविवाह करणार्या शहरातील ११ जणांवर महिला आणि बालकल्याण विभागाने कारवाई केली असून त्यांना समज दिली आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाने विवाह चालू असतांना घटनास्थळी जाऊन विवाह रोखले आणि ११ जणांकडून पुन्हा बालविवाह लावण्याचे कृत्य करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहे.