नगर येथे जप्त केलेल्या टँकरमधील ‘डिझेल’ चोरतांना पोलिसालाच रंगेहात पकडले !
|
पाथर्डी (नगर) – येथील पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या बनावट डिझेल चोरीच्या २ टँकरमधील ३ लाख रुपये मूल्याचे ५०० लिटर मिनरल बायोडिझेल चोरी करतांना एका पोलीस कर्मचार्यासह चौघांविरुद्ध कट करून बायोडिझेल चोरीचा, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरीच्या विक्रीच्या कटामध्ये पाथर्डी पोलीस ठाण्यातील दीपक शेंडे यांनी त्यांना साहाय्य केले. तक्रारदार पोलीस नाईक ईश्वर गर्जे यांनी या प्रकरणी तक्रार नोंद केली आहे.