व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे निवेदन !

कोल्हापूर, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालय येथे निवेदन देण्यात आले.

१. हुपरी येथे मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार आणि हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी आणि ३ महाविद्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री नितीन काकडे, प्रसाद देसाई, बालाजी धायगुडे, हेमंत घोरपडे, रामभाऊ मेथे, विजय मेथे, महादेव आढावकर, ओमराज माळवदे, विनायक परीट, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे  उपस्थित होते.

कोल्हापूर येथे जिल्हा परिषद येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. आशा उबाळे यांना निवेदन देतांना शिवसेनेचे श्री. राजू यादव आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे

२. जिल्हा परिषद येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. आशा उबाळे, माध्यमिक शिक्षण विभागात नलवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांचे स्वीय साहाय्यक अमोल पाटील, तर विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण विभागात डॉ. हेमंत कठरे यांच्या वतीने साहाय्यक लेखाधिकारी नितीन खराडे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, धर्मप्रेमी सर्वश्री प्रवीण पडवळ, दत्तात्रय मिसाळ, रामभाऊ मेथे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, सर्वश्री दीपक कातवरे, शिवानंद स्वामी उपस्थित होते.

३. कागल येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री किरण कुलकर्णी, शंभूराजे कुलकर्णी, समर्थ सणगर, प्रणव भंडारी, सुदर्शन यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.

४. गडहिंग्लज येथे गट शिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांना, प्रांताधिकारी कार्यालयात महसूल साहाय्यक शिवाजी संतराम भोसले यांना, तसेच उपअधीक्षक पोलीस कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. मनोज पोवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजीव भाऊसाहेब चव्हाण, सौ. रंजना पाटील, सौ. सुधा बिलावर, कु. गणेश हजारे, कु. साक्षी पाटील, श्री. उमेश विचारे, श्री. जर्नादन देसाई उपस्थित होते.

गडहिंग्लज येथे जागृती ज्युनिअर महाविद्यालयात निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या

५. संकेश्वर (कर्नाटक) येथे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. सचिन मोकाशी, निळकंठ लब्बी, हिंदुत्वनिष्ठ श्री. जयप्रकाश सावंत उपस्थित होते.

६. चंदगड येथे नायब तहसीलदार कामत यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री सर्वश्री महंतेश देसाई, विकास चव्हाण, तुकाराम मरगाळे, तेजस गावडे, दयानंद पाटील उपस्थित होते.

विशेष

१. शाळा महाविद्यालयात निवेदन देण्यात प्रशिक्षण वर्गातील युवा साधकांचा चांगला पुढाकार होता. युवा साधकांनी ८ शाळा, १५ महाविद्यालये आणि २ ग्रामपंचायत येथे निवेदन दिली. यात सर्वश्री प्रथमेश गावडे, पराग गावडे, संकेत कुलकर्णी, सुयश बराले, सिद्धेश बराले यांचा सहभाग होता.

२. चंदगड तालुक्यात १२ शाळा-महाविद्यालयात निवेदन देण्यात धर्मप्रेमी आणि युवा प्रशिक्षणार्थी यांचा पुढाकार होता.

कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्रतिसाद

स.म. लोहिया हायस्कूल आणि ज्युनिअर महाविद्यालय येथे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या प्रशिक्षणवर्गातील युवा कार्यकर्ते
पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर येथे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या प्रशिक्षणवर्गातील युवा कार्यकर्ते
कोल्हापूर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या प्रशिक्षणवर्गातील युवा कार्यकर्ते
आर्किटेक्चर कॉलेज, कोल्हापूर येथे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या प्रशिक्षणवर्गातील युवा कार्यकर्ते

१. केदारी रेडकर आयुर्वेदिक महाविद्यालय – आम्ही हा विषय सर्व विद्यार्थ्यांना सांगू

२. केदारी रेडेकर नर्सिंग महाविद्यालय – निवेदन सूचना फलकावर लावू, तसेच सर्व शिक्षक-विद्यार्थी यांना विषय सांगू.

३. साई इंटरनॅशनल महाविद्यालय – आम्ही अगोदरच हा विषय विद्यार्थ्यांना सांगितलेला आहे, असे अपप्रकार घडू नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

४. विवेकानंद महाविद्यालय – तुमचे कार्य चांगले आहे. निवेदन काचफलकात लावू, तसेच ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून त्यांच्या ‘व्हॉट्सॲप’वर पाठवण्यात येईल.

५. एम्.आर्. महाविद्यालय – ‘व्हॅलेंटाईन डे’चा विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणे पुष्कळ आवश्यक आहे. महाविद्यालयातील सर्व अध्यापकवर्गाला विषय सांगून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करू.

६. जागृती ज्युनियर कॉलेज – विद्यार्थ्यांचे प्रबोधन करू.

७. जयसिंगपूर येथील श्रीपद्माराजे कनिष्ठ महाविद्यालय, शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे प्राचार्य सी.एस्. पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यावर ते म्हणाले, ‘‘याविषयी आम्ही विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणारे व्याख्यान ठेवले होते, तसेच गेल्या १९ वर्षांत आमच्या महाविद्यालयात असा कोणताही ‘डे’ साजरा केला जात नाही.’’

निवेदन स्वीकाल्यावर जयसिंगपूर येथील डॉ. जे.जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे असले कोणतेही अपप्रकार होत नाहीत आणि असे काही घडल्यास त्याविरोधात कारवाई केली जाते.’’ डॉ. जे.जे. मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रमोद आप्पासाहेब बुद्रुक म्हणाले, ‘‘समिती चांगले कार्य करत असून आम्ही पोलीस ठाण्यामधून अधिकार्‍यांना बोलावून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करतो.’’

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील शिरोळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना निवेदन देण्यात आले.