आसमच्या बांगलादेश सीमेवर गोवंशांची तस्करी करणार्यांकडून सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर आक्रमण
|
गोवंशांची तस्करी करणारे कालपर्यंत गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर आक्रमण करत होते, आता ते सैनिकांवरही आक्रमण करण्याचे धाडस करत आहेत. हे पहाता अशांना फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करणे आवश्यक आहे ! – संपादक |
गुवाहाटी (आसाम) – आसामच्या मानकाचर येथील बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात एक बांगलादेशी तस्कर ठार झाला. येथे काही तस्कर सीमेवरील कुंपणावरून गायींना क्रेनच्या साहाय्याने वर उचलून बांगलादेशाच्या सीमेमध्ये टाकत होते. त्या वेळी सैनिकांनी तस्करांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सैनिकांवर आक्रमण केले. या वेळी येथून ३ गायी आणि शस्त्रे जप्त करण्यात आली.
सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्याने सांगितले की, भारताच्या बाजूने २० ते २५ तस्कर गायींना सीमेवरील कुंपणावरून बांगलादेशच्या सीमेमध्ये टाकत होते. या वेळी बांगलादेशच्या सीमेमध्येही काही तस्कर उपस्थित होते.
Assam | Cattle smugglers from both sides were trying to smuggle across Indo-Bangladesh border. BSF forces challenged smugglers but they tried to overpower us. Later, we fired at them & a Bangladeshi smuggler was killed and 3 cattle were recovered: JC Nayak, BSF DIG Dhurbi Sector pic.twitter.com/zfc4NpX8t8
— ANI (@ANI) February 13, 2022
वर्ष २०२१ मध्ये ८ सहस्र गोवंश जप्त
सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०२१ मध्ये ११ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह ८ सहस्र गोवंश जप्त करण्यात आले, तसेच ११७ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले.