तंजावर (तमिळनाडू) येथील लावण्या या विद्यार्थिनीच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयच करणार !
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीला विरोध करणारी याचिका फेटाळली
तंजावर (तमिळनाडू) – येथे एका कॉन्व्हेंट शाळेत शिकणार्या लावण्या या हिंदु विद्यार्थिनीचा ख्रिस्ती धर्म न स्वीकारल्याचे छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) चौकशी करण्यात येत आहे. ‘ही चौकशी थांबवण्यात यावी’, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. यावर निर्णय देतांना न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली, तसेच तमिळनाडू पोलिसांना ‘त्यांनी याविषयी जमवलेले पुरावे आणि अन्य माहिती सीबीआयला सुपुर्द करावी’, असा आदेशही दिला.
Supreme Court refuses to interfere in Madras HC order to transfer Lavanya Suicide Case to CBI, quashes TN govt’s pleahttps://t.co/8bvJHnXFQe
— OpIndia.com (@OpIndia_com) February 14, 2022