बिहारमधून चोरी झालेली भगवान बुद्धांची मूर्ती इटलीकडून भारताला परत !
मिलान (इटली) – बिहारच्या कुंडलपूर बौद्ध मंदिरातून वर्ष २००० मध्ये चोरण्यात आलेली पाषणापासून बनवलेली भगवान बुद्धांची ‘अवलोकितेश्वर पद्मपाणि’ मूर्ती इटलीमधील भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आली आहे. ही मूर्ती ८व्या किंवा १२व्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे. यात भगवान बुद्धांनी त्यांच्या डाव्या हातात कमळ धरलेले आहे.